बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता तिथे सुखाने रहा, पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका”

सिंधुदुर्ग | भारतीय जनता पार्टीला राणेंना मंत्रिपद द्यायचं होतं, ते त्यांनी दिलं, आता तिथे सुखाने रहा. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका, असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला आहे.

आपल्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्या टीकेला विनायक राऊत यानी प्रत्युत्तर दिलं. ते सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे यांचा शिवसेनेकडे आणि खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे, तो आजही बदललेला नाही, याच गोष्टीचं दुःख वाटतं. तसेच नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग मंत्री करा, अतिवरिष्ठ मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा, शिवसेनेला दुःख वाटण्याचं कारण नाही, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. राणे यांनी पहिल्याच दिवशी कामाचा धडाका लावल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. आपण मंत्रालयात पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्याचं माहिती होतं. असं असताना तयारी कशी केली गेली नाही? असा सवाल राणेंनी विचारला होता. राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची चर्चा राजधानी दिल्लीतही चांगलीच गाजली.

थोडक्यात बातम्या- 

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा- सीमा आठवले

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

“…तरच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल”

घरात पूजा करताना जळत्या कापरामुळे लुंगीने पेट घेतला; मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा मृत्यू

कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा धोका?; ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More