बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिनला मी दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिलं, तब्बल 15 वर्षानंतर या अंपायरने केलं मान्य

मुंबई | क्रिकेटच्या इतिहासातील एक हाय प्रोफाईल अंपायर मानले जाणारे स्टिव्ह बकनर यांनी निवृत्तीच्या तब्बल 15 वर्षांनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला चुकीचं बाद दिल्याचं मान्य केलंय. बकनर यांनी सचिनला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिलं असल्याचं सांगितलं आहे. मेसन अॅन्ड ग्रेस्ट या रेडिओवरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मान्य केलं.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना बकनर म्हणाले, एकदा 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध सचिनला एलबीडब्ल्यू आऊट दिलं होतं, मात्र त्यावेळी चेंडू विकेटच्या वरून जात होता. तर दुसऱ्यावेळी 2005 मध्ये विकेटच्या मागे झेलबाद दिलं होतं. त्यावेळेस सचिनच्या बॅटला चेंडू लागला नव्हता.

बकनर पुढे म्हणाले, चूक माणसाकडून होते, मी पण माणूस आहे आणि मी केलेल्या या चुकांचा मला खेदही आहे. आपण केलेल्या चुकांचा स्विकार करणं हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे.

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात जर सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं नसतं तर 34 शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर कोरला गेला असता. सचिनच्या चाहत्यांच्या मनात मात्र अजूनही बकनरबाबत चुकीचं बाद दिल्याचा राग आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

गुड न्यूज! अखेर कोरोनावर औषध सापडलं, डीजीसीआयकडूनही मिळाली परवानगी

नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर निघून गेले

महत्वाच्या बातम्या-

ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, गुजरात हायकोर्टाचा सरकारला हा सवाल

‘ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केलं?’; संजय राऊतांचा मोदींना सवाल

सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More