बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजूनही भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होऊ शकतं”

मुंबई | भाजप नेत्यांनी अनेकवेळा शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्याची इच्छा नसल्याचं बोलून दाखवलं आहे. शिवाय शिवसेनेनं देखील तीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले ( Union Minister Of Social Affairs) यांनी शिवसेनेनं आणि भाजपने पुन्हा एकदा एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे.

ते म्हणाले, शिवसेनेनं आपला निर्णय बदलावा. बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न साकार करायचं असेल तर, शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आली पाहिजे. त्यासाठी भाजप-शिवसेना आणि आरपीआय एकत्र आले पाहिजेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. पुढे ते असेही म्हणाले, अडीच वर्षाचा जो फॉर्म्युला होता. त्यावर पुन्हा भाजप- शिवसेनेचं एकमत व्हायला काही हरकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले, अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. शिवाय त्यांनी अजूनही राज्यात शिवसेना आणि भाजप यांचं सरकार स्थापन होऊ शकतं, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीत सध्या अनेक विषयांवरून वाद आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचांराचे अनेक आरोप आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे,  त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राच्या सत्तेत राहणं योग्य नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More