Sleep Habits l पालक (Parents) आणि मुलांचे नाते घट्ट असते, आणि मुलांना आई-वडिलांजवळ झोपायला आवडते कारण त्यांना सुरक्षित वाटते. पण जसजसे वय वाढते, तसतसे मुलांनी स्वतंत्र झोपायला शिकणे गरजेचे आहे. अनेक पालक (Parents) मुलांना १० वर्षांचे झाल्यावरही सोबत झोपवतात, पण याचा परिणाम मुलांच्या स्वभावावर आणि विकासावर होऊ शकतो.
स्वतंत्र न झोपण्याचे परिणाम:
बाल मानसशास्त्रानुसार, जर मुलांनी योग्य वयात स्वतंत्र झोपायला सुरुवात केली नाही, तर त्यांच्यात आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास विकसित होत नाही. तसेच, त्यांच्यात स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढते. ते सामाजिकदृष्ट्या एकटे राहण्यास घाबरतात आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
मुलांवर होणारे ५ गंभीर परिणाम:
जर तुमची मुले १० वर्षांनंतरही तुमच्यासोबत झोपत असतील, तर वेळीच सावध व्हा. कारण याचा परिणाम म्हणून, त्यांना पुढील ५ महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यात अडचणी येऊ शकतात. स्वतः झोपण्याची सवय नसल्यास मुलांना स्वावलंबी बनण्यास वेळ लागतो. त्यांना प्रत्येक निर्णयासाठी पालकांची गरज भासते आणि स्वतंत्र राहण्याचा आत्मविश्वास मिळत नाही.
लहान वयातच स्वतंत्र न झोपल्यास मुलांना अंधाराची, एकटे राहण्याची किंवा नवीन ठिकाणी झोपण्याची भीती वाटते. ते सतत कोणावर तरी अवलंबून राहतात. स्वतःची जागा (Space), जबाबदारी आणि वैयक्तिक स्पेस या गोष्टी न शिकल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. स्वतंत्र झोपणाऱ्या मुलांमध्ये निर्णयक्षमता चांगली असते, पण पालकांसोबत झोपणाऱ्या मुलांना सतत मदतीची गरज लागते.
पर्सनल स्पेसची कमतरता:- मुलांना लहान वयातच पर्सनल स्पेसचे (Personal Space) महत्त्व समजणे आवश्यक असते. सतत पालकांसोबत झोपणाऱ्या मुलांना स्वतःची स्पेस (Space) आणि दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करायला उशीर
झोपेची समस्या :- स्वत:च्या खोलीत झोपण्याची सवय नसल्यास मुलांची झोपेची वेळ विस्कळीत होते.