बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींकडून पराभूत झालेल्या प्रियंका टिबेरवाल म्हणतात…’मीच या खेळाची मॅन ऑफ द मॅच…’

कोलकाता | पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री आणि तृणमूल काॅंग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी भाजपच्या प्रियंका टिबेरवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता बंगालच्या मुख्यमंत्रिपदी ममता बनर्जी कायम राहणार आहेत.  ममता बॅनर्जींकडून पराभूत झाल्यानंतर टिबेरवाल यांनी निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया दिली.

मी या खेळाची ‘मॅन ऑफ द मॅच’ कारण मी ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि 25 हजारांपेक्षा अधिक मतं मिळवली. कठोर परिश्रम सुरू ठेवेल आणि यापुढे देखील ममता बॅनर्जींना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे, असं प्रियंका टिबेरवाल म्हणाल्या.

जेव्हा पासून पश्चिम बंगालची निवडणुक सुरू झाली, तेव्हा केंद्र सरकारने आम्हाला सत्तेतून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं होतंं. माझ्या पायाला दुखापत झाली जेणेकरून मी निवडणुक लढू नये. मी जनतेची आभारी आहे की त्यांनी मला मतदान केलं आणि निवडणुक आयोगाने देखील सहा महिन्यांच्या आतमध्ये निवडणुक घेतली, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी मतदारांचे आभार मानले.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांना भवानीपूरची पोटनिवडणुकीत विजय मिळवणं आवश्यक होतं. कारण या विजयामुळे त्या मुख्यमंत्रिपदी कायम राहणार होत्या. त्यामुळे भाजपने ममता बॅंनर्जी यांच्या विरोधात प्रियंका टिबरेवाल यांना उभं केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी…’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

शाहरूख खानचा मुलगा असू नाहीतर इतर कोणाचाही त्याला…- रामदास आठवले

‘मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत…’; नवज्योत सिंग सिद्धूंचं मोठं वक्तव्य!

कंगणा राणावतला ‘या’ मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता?

मोठी बातमी! चौकशीनंतर अखेर शाहरूख खानच्या मुलाला NCB कडून अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More