Stock Market l सप्टेंबर 2024 पासून शेअर बाजारात (Share Market) सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. केवळ शेअर बाजारच नाही, तर म्युच्युअल फंड पोर्टफोलिओदेखील नकारात्मक स्थितीत आले आहेत. विशेषतः मिड-कॅप समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण :
बाजारातील घसरणीचा सर्वाधिक परिणाम स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्सवर झाला आहे. यामुळे अनेक म्युच्युअल फंड (Mutual Fund) कंपन्यांनी मिड कॅप स्टॉकमधील गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही एसआयपी (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेक मोठ्या फंडांनी 9 वेगवेगळ्या मिड कॅप स्टॉकमधून आपली गुंतवणूक पूर्णपणे काढून घेतली आहे.
एचडीएफसी (HDFC) म्युच्युअल फंडाने जानेवारी महिन्यात टाटा केमिकल्सचे 37.17 लाख शेअर्स विकले. एसबीआय (SBI) म्युच्युअल फंडाने पर्सिस्टंट सिस्टमचे सुमारे 1.52 लाख शेअर्स विकले आहेत. ॲक्सिस म्युच्युअळ फंडाने टाटा टेक्नॉलॉजीचे 5.64 लाख शेअर्स विकून आपली गुंतवणूक काढली आहे.
Stock Market l झी एंटरटेनमेंट आणि आयआरसीटीसीच्या शेअर्सची विक्री :
निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने झी एंटरटेनमेंट (Zee Entertainment) आणि आयआरसीटीसीमधील (IRCTC) आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली आहे. या फंड हाउसने झी एंटरटेनमेंटचे 1.78 कोटी शेअर्स आणि आयआरसीटीसीचे 7.64 लाख शेअर्स विकले. क्वांट म्युच्युअल फंडाने पूनावाला फिनकॉर्पचे 1.47 कोटी शेअर्स आणि रॅमको सिमेंटचे 9.94 लाख शेअर्स विकले. तसेच, ग्लँड फार्मामध्ये असलेली गुंतवणूकही काढून घेतली आहे. आयसीआयसीआय (ICICI) प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने इंडियन हॉटेल्सचे 7.34 लाख शेअर्स विकले आहेत.