बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चोरालाही फुटला पाझर; सॉरी म्हणत चुकून चोरलेल्या कोरोना लसी केल्या परत

नवी दिल्ली | कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वजण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य माणूस आपलं योगदान देत आहे. मात्र या परिस्थितीत काहीजण गंभीर परिस्थितीचा फायदा घेणारे काही कमी लोक नाहीत. सध्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत आहे. इंजेक्शनचा काळाबाजारही होताना अनेकांना अटक करण्यात आली. मात्र अशात माणुसकी आणखी जिवंत असल्याचं दिसत आहे.

हरियाणामधील जिंद येथील सिव्हिल रूग्णालयातून 12 वाजताच्या सुमारास कोरोनाच्या लसी चोरल्या. मात्र बाहेरील कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यालाही पाझर फुटला. दुसऱ्या दिवशी त्या चोरानेसिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर चोरलेली सर्व औषधे एका चहा विक्रेत्याकडे दिली आणि ते सर्व डोस पोलिसांना देण्यास सांगितले. त्यामध्ये त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि माफी मागितली.

सॉरी, मला माहीत नव्हतं यात कोरोनाचं औषध आहे, असं त्या चोराने चिठ्ठीत लिहिलं. चोराने चोरी केली पण त्याला कोरोनाच्या या परिस्थितीचं गांभीर्य असल्याने त्याने हे कृत्य केलं.

दरम्यान,पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा त्यात कोविशिल्डचे 182 आणि कोवाक्सिनच्या 440 डोस होते. चोराला रेमडेसीवीर इंजेक्शन चोरायचे होते मात्र त्याच्याकडून लसी चोरल्या गेल्याचा अंदाज जिंग पोलीसचे डिएसपी जितेंद्र खटकड यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

चांगली बातमी! महाराष्ट्रासाठी 1661 मेट्रिक टन ऑक्सिजन उचलण्यास केंद्राची मंजुरी

चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे- नाना पटोले

“तुला 1 मे आधी लस मिळालीच कशी”; मुलानंच घेतली अनिल कपूरची फिरकी

आता ताप कोणताही असो कोरोना चाचणी होणार; ‘या’ जिल्ह्यासाठी नवा नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More