Stomach Infection | पावसाळा म्हटलं की, बऱ्याच जणांना चटकदार पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. पावसाळ्यात कांदा भजी, समोसे तसेच बाहेरच्या चटकदार आणि झणझणीत पदार्थांवर ताव मारला जातो. मात्र, हेच पदार्थ अधिक खाल्ल्याने पोटाचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात काही पदार्थ खाणे (Stomach Infection) टाळले पाहिजे, असं तज्ञ म्हणतात.
या लेखात पावसाच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कोणते पदार्थ खाऊ नयेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही या काळात पोटाचे आजार होण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. पावसाळ्यात काय काळजी घ्यावी, याच्या टिप्स खाली दिल्या आहेत.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या
गरम पाणी प्या: पावसाळ्यात जंतू वेगाने वाढतात, ज्यामुळे पिण्याचे पाणी देखील दूषित होऊ शकते. त्यामुळे पाणी चांगले उकळून प्या. यामुळे पाण्यात असलेले जंतू नष्ट होतात. तसेच, पाणी उघड्यावर सोडू नका. यामुळे डास (Stomach Infection)त्यात अंडी घालतात.
स्ट्रीट फूड खाऊ नका : पावसाळ्यात अन्न पदार्थांवर माशा बसतात. यामुळे अन्न दूषित होते. बाहेरच्या पदार्थांवर तर माशा नुसत्याच गोंगावत असतात.असे दूषित अन्न खाल्ल्याने संसर्ग होतो. दुसरे म्हणजे, रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांमध्ये ताज्या भाज्या टाकल्या गेल्या किंवा त्या स्वच्छ धुवून काढल्या की नाही, याबाबत खात्री (Stomach Infection)नसते.
कच्चे अन्न खाऊ नका : पावसाळ्यात कच्च्या भाज्या आणि फळांवर कीटक आणि जंतूंचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे ते कच्चे खाणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे या ऋतूत सॅलड किंवा ज्यूस वगैरे पिणे टाळा आणि भाज्या चांगल्या धुवून शिजवून खा.
प्रोबायोटिक्स खा : या ऋतूमध्ये पोटाचा संसर्ग टाळण्यासाठी, आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या (Stomach Infection)आहारात प्रोबायोटिक्सचा नक्कीच समावेश करा.यासाठी दही आणि ताक यांचा आहारात समावेश करता येईल. पण, जर तुम्हाला सर्दी आणि फ्लूची समस्या असेल तर त्याऐवजी तुम्ही आहारात फर्मेंटेड फूड्स सामील करू शकता.
प्रतिकारशक्ती वाढवा : या ऋतुमध्ये संसर्ग टाळण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन-सी, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि (Stomach Infection)मॅग्नेशियम समृद्ध पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल.
News Title- Stomach Infection in Monsoon
महत्त्वाच्या बातम्या –
तळीरामांची चांदी! देशभरात दारू होणार स्वस्त?, अर्थसंकल्पात काय केली तरतूद?
बजेटनंतर ‘या’ 9 शेअरमध्ये करा गुंतवणूक; होईल फायदाच फायदा
अर्थसंकल्पावरून टीका करणाऱ्या विरोधकांना अर्थमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या..
दिशा सालियनप्रकरणी ठाकरे पिता-पुत्राला फसवण्याचा डाव?, फडणवीसांचं नाव घेत अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
“दरेकरांनी कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखे दिसतील”; जरांगे पाटील यांची टीका