बीड | मराठा क्रांती मोर्चाने अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतलं आहे. गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आधी लक्ष्मण पवारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर ते त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बाहेर आले. चर्चा झाल्यानंतर काही आंदोलकांनी पवारांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जमावाला पसरवले आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला. आता मात्र शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप
-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!
-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार
-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे