बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली”

पुणे | भाजप नेता आणि माजी खासदार किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाई फेकल्याची घटना घडली आहे.  हे कृत्य शिवसैनिकांनीच केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?, हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली, आता सुरू झाली हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशिमला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला, हा त्याचाच पुरावा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिमधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्यासाठी सोमय्या जात होते.  मात्र भावना गवळी यांच्या काही समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीवर दगड आणि शाईफेक केल्याचंं भाजपकडून सांगितले जात आहे.

दरम्यान,  घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तरीही लोकांची गर्दी कमी न झाल्याने अखेर पोलिसांना लोकांवर लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर किरीट सोमय्या घटनास्थाळावरून निघून गेले.

 

 

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

“खासदार छत्रपती संभाजीराजेंना तातडीने अटक करावी”

“अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे दगड फेकून अंगावर घाण उडवून घेतल्यासारखं”

“सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला”

‘औवेसींना त्यांच्या महिला….’; अफगाणिस्तानसोबत भारताची बरोबरी केल्याने केंद्रीय मंत्री संतापल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More