Top News महाराष्ट्र मुंबई

मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा- रतन टाटा

मुंबई | टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाला आदर आहे. टाटांनी कोरोना काळात सरकारला भक्कम अशी मदत केली होती. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या कंपनीतील कामगांराच्या पगारात कपात न करता त्यांनी पुर्ण पगार दिले होते. त्यामुळे टाटांना भारतरत्न द्यावा अशी मागणी जोर धरू लागली. मात्र टाटांनी ही मागणी थांबवण्याची विनंती केली आहे.

मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. मात्र माझी एक विनंती आहे की ही मोहिम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहील, असं रतन टाटांनी म्हटलं आहे. टाटांनी याबाबत ट्विट केलं आहे.

रतन टाटांना भारतरत्ना मिळावा अशी मागणी सर्वप्रथम मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी केली होती. यासाठी त्यांनी #BharatRatnaForRatanTata असा हॅशटॅगसुदधा ट्विटरवर चालवला होता.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्यांनी कामगांरांना अर्धे पगार दिले. मात्र टाटांनी आपल्या कामगारांचे पगार पुर्ण दिले त्यासोबत मजबुत असा बोनसही दिवाळीमध्ये वाटला होता.

 

 

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा वाशी टोलनाका फोडू”

‘फासा आम्हीच पलटणार’ देेवेंद्र फडणवींसाच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही त्याऐवजी…’; या माजी खासदाराने केली सचिनवर टीका

‘ज्यांना कोणाला पक्षात यायचं असेल त्यांना दारं खुली पण…’; राज ठाकरेंची खुली ऑफर

…म्हणून कंगणाची ट्विटरला धमकी; म्हणाली, “टिकटाॅकसारखं तुलाही बॅन करु”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या