बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर ड्रोन हल्ले करण्याचा अधिकार अमेरिकेकडे आहे’; अमेरिकेचा पाकिस्तानला धमकीवजा इशारा!

वॉशिंग्टन | अमेरिकन सैन्यांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतलं आहे. जवळपास 20 वर्षापासून अमेरिकेने आपले सैनिक अफगाणिस्तानमध्ये तैनात केले होते. त्यानंतर जगभरात अफगाणिस्तानमधील घडामोडींची चर्चा चालू झाली. अशातच आता अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांना आसरा न देण्याबाबत धमकीवजा इशारा दिला आहे.

अल कायदासारख्या अनेक दहशतवादी संघटना सध्या पाकिस्तानात आहेत आणि ही गोष्ट खरोखर चिंतेची बाब आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पाकिस्तान दहशतवाद्यांचा बंदोबस्त करू शकला नाही,अशी माहिती गुरुवारी पेंटागॉनने दिली. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाकिस्तान हा दहशतवाद्यांना फक्त आश्रयच नाही तर पोसण्यासाठीही मदत करत असल्याचं सांगितलं.

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आसरासंदर्भात अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच बरोबर अमेरिकेने आता पाकिस्तानला दहशतवाद्यांना आसरा देण्याबद्दल कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसणं बंद करावं नाहीतर दहशवादी ठिकाणांवर ड्रोन हल्ले करण्याचा अधिकार अमेरिकेकडे आहेत, असं अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तान अल कायदा आणि इतर दहशतवाद्यांना जागा पूरवतो. त्यामुळे या दहशतवादी संघटनापासून पाकिस्तानी नागरिकांना देखील धोका आहे. तालिबानी अतिरेक्यांना पाकिस्तान कसा लपवत आहे. हे अनेकदा अफगाणिस्तानचे राष्ट्रध्याक्ष अशरफ घनी यांनी आम्हांला सांगितलं. पाकिस्तान दहशतवाद्यांना वैद्यकीय सुविधाही पुरवत असल्याचं अशरफ घनी यांनी आम्हांला सांगितलं आहे, अशी माहिती पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी दिली.

थोडक्यात बातम्या- 

“आमचं 2024 ला सरकार येणार, आम्ही शेतकऱ्यांना नक्की मदत करू”

याला म्हणतात ऑफर! अवघ्या 25 हजारात होंडा अॅक्टिव्हा आणा घरी, जर आवडली नाही तर….

एका दिवसात 1002 कोटींची कमाई, आशियाचे दुसरे सर्वात श्रीमंत कसे बनले गौतम अदानी?

“‘मी पुन्हा येईल’, हे मी गेल्या अडीच वर्षापासून ऐकतोय, सत्यात कधी येणार तुम्हीच सांगा”

पोलिसांनी घरात घुसून मारहाण केली अन्…; UPSC देणाऱ्या विद्यार्थिनीचे गंभीर आरोप!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More