Top News कोरोना महाराष्ट्र मुंबई

‘रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | राज्यात रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा. तसेच यात तातडीने हस्तक्षेप करून गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबळींचीही संख्या वाढत आहे. अशा वेळी रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचं औषध आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे, असं फडणवीस म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“हाथरस प्रकरणातील तरुणीची तिच्या आई आणि भावानेच हत्या केली, ते चारही युवक निर्दोष”

“योगीजी मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहे, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या”

“पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी राजीनामा द्या”

“योगी आदित्यनाथ यांना 50 लाख देतो त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या