बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय’; ममता बॅनर्जींचा मोदींवर निशाणा

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये शनिवारी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीचीच वाढ होतेय, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदींना टोला लगावला. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या.

शुक्रवारी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. उद्योगांची वाढ थांबली आहे. परंतु त्यांची दाढी वाढत आहे. काहीवेळा ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवतात आणि काहीवेळा ते स्टेडिअमचं नाव बदलून आपलं नाव ठेवतात. त्यांच्या डोक्यात काही बिघडलंय, त्यांचा स्र्कू ढिला झालायं असं वाटतंय, असं म्हणत ममता बॅनर्जींनी मोदींवर निशाणा साधला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सरकारी मालमत्ता विकायला काढल्या जात आहेत. आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहे. रविंद्रनाथ टागोर यांची जन्मभूमी जोडासांकू सांगतात. विद्यासागर यांची मूर्ती तोडतात. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केला आहे.

दरम्यान,  पश्चिम बंगालमधील पाच जिल्ह्यातील एकूण 30 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात 73 लाख 80 हजार 942 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ कारणामुळे महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का?- अतुल भातखळकर

धक्कादायक! मास्क न घालणाऱ्यांकडून करत होती वसुली, तेवढ्यात तीचं बिंग फुटलं!

माझा नाही तर कोणाचाच नाही! संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाऊल

…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी

अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आदळला पक्षी, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More