बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा- नवाब मलिक

मुंबई | रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे. तसेच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

औषधांना वैद्यकीय मान्यता नाही, त्याविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले.

देशात कोरोनाचं संकट कायम आहे. अशावेळी गोमूत्र प्यायला सांगितलं जात आहे. रामदेव सारख्यांच्या औषधांच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री जातात. हे नियम आणि कायद्याला धरून नाही. त्याचा आरोग्य मंत्रालयाने विचार केला पाहिजे, असं नवाब मलिक म्हणालेत. लोकांनी प्रशसानाला सहकार्य केलं आहे. त्यामुळे आकडे कमी होताना दिसत आहेत. नागरिकांनी आणखी सहकार्य करावं. आकडे अधिक घटल्यास मिशन बिगीन अगेनचा सरकार विचार करेल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मोदी सरकारला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप आणि मोदी सरकारला सगळे ओळखून आहेत. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सेलिब्रेशन न करण्याचं आवाहन केलं आहे. पण त्यांना कार्यकर्त्यांना असं का सांगावं लागलं? त्यांचे कार्यकर्ते सेलिब्रेशन करणार होते का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘…नाहीतर मेडिकल दुकानदार संपावर जाणार’, राज्य सरकारला दिला 5 दिवसांचा अल्टीमेटम!

‘द बेस्ट ऑस्कर एव्हर’ म्हणत राम गोपाल वर्मांनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली

सोनूने कहर केला, 13 मुलांना नादी लावून लग्न केलं अन्…

पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; दोन दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More