बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“Work From Home बंद करा नाहीतर आमचा संसार मोडेल”

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या कंपन्यांनी कामगारांना ‘वर्क फ्राॅम होम’ दिलं आहे. सध्या देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. तरी सुद्धा अनेक कंपन्यांचं घरुन काम सुरु आहे. अशातच एका महिलेने केलेल्या विनंतीची देशभर चर्चा रंगली आहे.

प्रसिद्ध आरपीजी कंपनीचे मालिक हर्ष गोयंका यांच्या एका कामगाऱ्याच्या पत्नीने हर्ष यांच्याकडे विनंती केली आहे. यामध्ये तिने घरुन काम बंद करुन तिच्या पतीला ऑफिसमध्ये बोलवण्यात यावं, अशी विनंती केली आहे. तसेच जर घरुन काम सुरु ठेवलं तर आमचा संसार मोडेल, असं देखील या महिलेने म्हटलं आहे.

संबंधित महिलेच्या पतीचं नाव मनोज असं असून तो दिवसातून 10 वेळा काॅफी पितो. तसेच वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन बसतो आणि तिथं पसारा करुन बाहेर येतो, अशी व्यथा या महिलेने कंपनीचे मालकाकडे मांडली आहे. एवढंच नाही तर मनोज यांच्या पत्नीनेे आपल्याला दोन मुलं असल्याने त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे मी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करते, असं म्हटलं आहे.

दरम्यान, मनोज यांच्या पत्नीने केलेल्या विनंतीला उत्तर देत, मी यावर काय उत्तर देऊ?, असा प्रश्न गोयंका यांना पडला आहे. तसं त्यांनी ट्विट देखील शेअर केलं आहे. या पोस्टवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. यावेळी अनेकांनी महिलेची बाजू समजून घेतली तर अनेकांनी मनोजची.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

काळजी घ्या! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; धक्कादायक माहिती समोर

…तर मला सामनाचं काम सोडावं लागेल- संजय राऊत

“मायबाप सरकार खरं बोला, पेगॅसस वापरलं की नाही?”

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं

किरीट सोमय्या यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर राहावं लागणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More