पुणे | कोरोनाच्या काळात स्वतःची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स यांचा कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आलं आता त्यांचेच व्यवस्थेकडून अर्थिक शोषण केलं जात आहे. त्यामुळं थकीत पगार मिळावा या मागणीकरिता पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा स्टाफ रस्त्यावर उतरला.
बुधवारी म्हणजेच 16 डिसेंबर रोजी कंत्राटी परिचारिका आणि वॉर्डबॉय यांनी जम्बो कोविड सेंटरच्या प्रवेशव्दारासमोर रास्ता रोको करीत आंदोलन केलं. या आंदोलनात तब्बल 90 कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान जम्बोमध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना अडचण होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्यांव्यतिरिक्त अन्य परिचारिका रुग्णालयात प्रत्यक्ष काम करीत होत्या.
जम्बो रुग्णालय सुरु झाले तेव्हा ‘लाईफ लाईन’ या एजन्सीकडे काम देण्यात आले होते. परंतु, अल्पावधीतच यांच्याकडू काम काढून घेतले. त्यानंतर ‘मेडब्रोस हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड’ या एजन्सीकडे काम देण्यात आले. या कंपनीने भरतीद्वारे 300 च्या आसपास नर्सिंग स्टाफ भरला.
नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना 35 हजार रुपयांचे वेतन निश्चित करण्यात आलं होतं. परंतू सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निम्माच पगार देण्यात आला. तर, नोव्हेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. याशिवाय पालिकेने आमच्यासाठी दिलेला 12 हजारांचा बोनसही एजन्सीने लंपास केला. दर महिन्याला अवघे दहा ते पंधरा हजार रुपये हातामध्ये टेकवले जात असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये- उद्धव ठाकरे
‘अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं’, असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर
…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय
येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ
‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी तुला कमीत कमी लाज वाटली पाहिजे’; दिलजीतचं कंगणाला उत्तर