बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ

भंडारा | भंडारा जिल्ह्यातील सिलेगाव येथे ग्रामसेविका आणि काही महिलांमध्ये तुफान मारहाण झाली असल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. एका कार्यक्रमाला जमल्यानंतर ही घटना झाली असून या प्रकारात आता पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे.

संबंधित घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथे घडली असून सिलेगाव ग्रामपंचायतीच्या दोन महिला सदस्यासह महिला सरपंच यांनी महिला ग्रामसेविकेला मारहाण केली. सिलेगाव ग्रामपंचायत येथे शिवस्वराज दिनाचा कार्यक्रम होता.

दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यानंतर ग्रामसेविका मंजूषा सहारे व सरपंच संध्या पारधी यांच्यात घरकुल वाटपाच्या ठरावावरून वाद होऊन प्रोसिडिंग कॉपी मागण्यावरुन महिला सरपंच संध्या पारधी व महिला ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्यात वाद वाढला. सरपंच व इतर सदस्यांनी महिला ग्रामसेविका सहारे यांना मारहाण केली आणि प्रोसिंडिंग कॉपी हिसकावून नेली.

सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्याकडून प्रोसिडिंग कॉपी हिसकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वाद आणखी चिघळला. यावेळी ग्रामपंचायत महिला सदस्य महिला मनीषा राहंगडाले यांनी ग्रामसेविका यांना अपशब्द बोलल्याने महिला ग्रामसेविका आणि महिला सदस्य यांच्यात तूफान हाणामारी झाली. हा वाद अखेर सिहोरा पोलिसात गेला असून तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

येत्या 4 दिवसांत ‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 यादीत रिया टाॅपला, द टाईम्सने केली यादी जाहीर

“अजितदादासोबत बांधावरची लढाई नाही, पण मी पक्षाबद्दल आणि मोदींबद्दल काहीच ऐकून घेणार नाही”

#कोरोना! घरी वाफ घेत असाल तर थांबा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स

अबब! स्वच्छतागृहात तब्बल साडेसहा फुटाचा नागोबा पाहून पोलिसाच्या तोंडचं पळालं पाणी 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More