बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाॅमीला कुत्रा का म्हटलं?; कुत्र्याच्या नावावरून दोन कुटूंबात तुफान हाणामारी

चंदीगड | जगात दोन प्रकारचे लोक असतात एक खाद्यप्रेमी आणि दुसरे श्वानप्रेमी, असं प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे म्हणायचे. अनेक श्वानप्रेमी घरात कुत्रा पाळतात. काही प्रेमी इंपोर्टेड कुत्री मागवतात. त्याची किंमत 1 लाखांपासून ते 25 लाखांपर्यंत असते. त्या कुत्र्यांना लोक वेगवेगळी नावं देतात. त्याला खूप जीव देखील लावतात. हरियाणातील ज्योती पार्कमध्ये एका कुत्र्यावरून दोन कुटूंबात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

गुरुग्रामच्या ज्योती पार्क येथील एका व्यक्तीनं एक कुत्रा पाळला आहे. त्या व्यक्तीनं प्रेमानं कुत्र्याचं नाव टॉमी असं ठेवलं. मात्र, हा कुत्रा अत्यंत आक्रमक असल्यानं अनेकदा तो येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना चावण्यासाठी धाव घेत असायचा. यामुळे आसपासचे नागरिक त्या  कुत्र्याला त्रस्त झाले होते. त्यामुळेच या व्यक्तीच्या शेजारीच राहाणाऱ्या सुधीर नावाच्या व्यक्तीनं कुत्र्याला साखळीनं बांधण्याचा सल्ला दिला.

कुत्र्याच्या मालकाला कुत्र्याला  साखळीनं बांधण्यास सांगितल्याबद्दल राग आला नाही, तर त्याच्या टाॅमीला कुत्रा का म्हटलं, या गोष्टीचा कुत्र्याच्या मालकाला राग आला. संतप्त झालेल्या मालकानं सुधीर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की कुत्र्याच्या मालकानं सुधीर यांना थेट मारहाण करण्यासच सुरुवात केली.

त्यानंतर, कुत्र्याचा मालक आणि सुधीरमध्ये काळीवेळातच काठ्यांनी हाणामारी चालू झाली. या दोघांच्या भांडणात त्यानंतर त्यांचे कुटूंब देखील सामिल झाले. त्यांच्या घरातील महिला, लहान मुलं देखील हाणामारी करू लागले. या घटनेत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करून घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ; तरूणांमध्ये संतापाचं वातावरण

मोबाईल इंटरनेट शिवाय Whatsapp वापरता येणार; वाचा कसं

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडीने दाखल केला गुन्हा

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूनं घेतली क्रीडा राज्यमंत्रिपदाची शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More