बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल तो बच्चा है जी! कॅरम खेळता-खेळता दोन म्हताऱ्यांमध्ये तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर हाणामारीचे सध्या व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण जास्तच वाढत आहे. त्यातील काही तर खूपच मजेशीर व्हिडीओ असतात. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, माणुष्य बाल्य अवस्शेत अल्लड असतो. तारूण्य अवस्थेत तो समंज्यस असतो. तर वृद्ध होयला लागल्यावर तो पुन्हा अल्लड होत जातो. म्हणजेच माणूस जसा-जसा मोठा होत जतो,तसा तो बारीक होत जातो.

याआधी तुम्ही नाक्यावरची अनेक मोठी-मोठी भांडण पाहिली असतील. परंतू तुम्ही कधी वृद्ध म्हताऱ्यांमधील भांडण पाहिली आहेत का?. याच्याशीच संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क दोन म्हताऱ्यांमध्ये चांगलीच हाणामारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध व्यक्ती कॅरम खेळत आहेत. कॅरम खेळता-खेळता अचानक त्यातील एका काळा टि-शर्ट घातलेल्या वृद्ध व्यक्तीला राग येतो. त्यानंतर तो एका पांढरा शर्ट घातलेल्या दुसऱ्या व्यक्तीला मारायला सुरूवात करतो. त्याला बसून मारता येत नसल्यामुळे तो उभा राहतो आणि आपल्या हातानी त्याच्या डोक्यात जोर-जोरात मारायला लागतो. दुसरा वृद्ध व्यक्ती न काही बोलता निमूटपणे त्याचा मार खाताना दिसत आहे.

मारत असताना त्या वृद्ध व्यक्तीचे हातातले घड्याळ फुटते आणि तो जरा शांत होतो. त्याचे सगळे लक्ष नंतर त्याच्या तुटलेल्या घड्याळकडे असल्यामुळे तो सुरू असलेली हाणामारी विसरून जातो. काळ्या रंगाचा टि-शर्ट घातलेला वृद्ध व्यक्ती आपलं तुटलेल्या घड्याळाचे पडलेले पार्ट शोधण्यात व्यस्थ असल्याचं दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडीओ अनेकांनी खूप मजेशीर आणि वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘…आता तुम्हीच सांगा मोदी साहेब?’; चिमुकलीनं थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार, पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; संघाचा धाकड खेळाडू आयपीएलला मुकणार?

“कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही, तो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्यासोबत राहू शकतो”

‘या’ जिल्ह्यानं महाराष्ट्राचं टेंशन वाढवलं; रुग्णसंख्येत घट, पण…

8 वर्षाच्या प्रेमात मिळाला धोका, त्यानंतर प्रियकराने जे केलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More