बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचे नियम धाब्यावर, ‘या’ ठिकाणी मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी

लखनऊ | कोरोनाच्या वाढत्या संसर्गानं संपूर्ण देश चिंताग्रस्त झाला आहे.  कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावण्याचा पर्याय निवडला आहे. तर, काही राज्यांत लॉकडाऊन जाहीर केला असून यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. मात्र, उत्तर प्रदेशात लॉकडाऊन असतानाही नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत आहे. मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुस्लिम धर्मगुरु अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. दरम्यान लॉकडाऊन असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी झाली होती. बदायूँ येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी अत्यंदर्शनासाठी उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक लॉकडाऊनचे नियम मोडित काढत मशिदीत पोहोचले होते. मशिदीच्या बाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बदायूँमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेदरम्यान कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्यानं अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 188 तसेच संबंधित इतर कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती बदायूँचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेत उत्तर प्रदेश सरकारनं करोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचबरोबर, अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे. तर, संबंधीत प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या

पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ; तरूणांमध्ये संतापाचं वातावरण

मोबाईल इंटरनेट शिवाय Whatsapp वापरता येणार; वाचा कसं

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडीने दाखल केला गुन्हा

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूनं घेतली क्रीडा राज्यमंत्रिपदाची शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More