बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातून कुणाला जाता येणार गावी?; कसा कराल अर्ज??? जाणून घ्या सर्व माहिती

पुणे | लॉकडाऊनदरम्यान पुण्यात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात जिल्ह्याधिकारी हे नोडल ऑफिसर असणार आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

नागरिक ज्या तालुक्यांमध्ये अडकले आहेत त्या तालुक्याच्या तहसीलदारांची परवानगी घेऊन त्यांना आपापल्या गावी परत जाता येणार आहे. नागरिकांना ऑनलाईन ई मेल करुनही आपापल्या गावी जाण्याची परवानगी घेता येणार आहे, असं डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

नागरिकांची गावी जाण्याअगोदर वैद्यकीय तपासणी केली जाईल. वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांना आपल्या इच्छित स्थळी जाता येणार आहे. याशिवाय घरी परतल्यावर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल, असं म्हैसेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे, अशी माहती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…

मोदी सरकारचा मोठा निर्णय; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी

महत्वाच्या बातम्या-

तळीरामांना मोठा दिलासा; दारुची दुकानं सुरू होणार पण…

महाराष्ट्र दिनी केंद्राचा महाराष्ट्राला धक्का; आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवलं

तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? वाचा संपूर्ण यादी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More