औरंगाबाद | महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. औरंगाबादमधील एका महिलेला कोरोना झालेला कळला नाही. मात्र कंबरदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर काढलेल्या रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर आली.
औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात राहणाऱ्या महिलेला कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला होता. हा त्रास खूप जास्त भयंकर वाटत होता. वारंवार उपचार घेऊनही बरं होत नसल्यानं डॉक्टरांनी या महिलेला MRI करण्याचा सल्ला दिला.
या MRI च्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेल्या संपूर्ण शरीरात पस तयार झाला होता. त्यामुळे या महिलेला वारंवार कंबरदुखीचा त्रास जाणवत होता.
डॉक्टरांनी या महिलेची कोरोना टेस्ट केली मात्र ती निगेटिव्ह आली पण महिलेच्या शरीरात अॅन्टीबॉडी आढल्यानं कोरोना होऊन गेला मात्र तो महिलेला कळला नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा!
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात!
‘शरद पवारांना आज मी पुन्हा सांगू इच्छितो…’; संभाजीराजे संतापले
‘या’ आमदाराला ED चा मोठा दणका; तब्बल 255 कोटींची संपत्ती जप्त
“जीडीपी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये”