बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

10वी नापास रिक्षाचालकाची अजब प्रेम कहाणी, आता राहतो स्वीत्झर्लंडमध्ये

नवी दिल्ली | राजस्थान येथील एक दहावी नापास रिक्षाचालक प्रेमात चक्क स्वीत्झर्लंडमध्ये पोहोचला असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित रिक्षाचालकाचे नाव रंजित सिंह राज असं आहे. रंजीतची प्रेयसी ही फ्रान्सची असल्यामुळे नंतर तो देखील तिकडेच रहिवासी झाला आहे. मात्र ही प्रेमकथा कशी सुरु झाली ते ऐकून कोणीही हैराण होईल.

राज हा अभ्यासात कच्चा होता. त्यामुळेच तो दहावी नापास झाला. अवघ्या 16 वर्षांचा असतानाच राजने रिक्षा घेऊन ती चालवण्यास सुरुवात केली. यावेळी राजला टुरिस्टना इंप्रेस करण्यासाठी रिक्षाचालक इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि इतर भाषा बोलतात, असं लक्षात आलं. यानंतर राजने इंग्लिश शिकण्यास सुरु केलं.

राजने त्याचा टुरिझम उद्योग चालू केला. यावेळी अनेक परदेशी राजस्थानला फिरायला येत असायचे. याचवेळी एक तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत राजस्थानला आली होती. तेव्हा राज त्यांना गाईड करत होता. यावेळी त्यांची चांगळी ओळख देखील झाली. संबंधित तरुणी आपल्या देशी परतल्यानंतर राज आणि ती स्काईपवर बोलत होते. यादरम्यान दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली.

दरम्यान, आपल्या प्रेमासाठी राजने अनेक वेळा फ्रांन्सला जाण्यासाठी विझा अप्लाय केला होता. मात्र न मिळाल्याने दोघांनी मिळून फ्रान्स दुतावासाकडे उपोषण चालू केले. यानंतर राज फ्रान्सला पोहोचल्यानंतर त्याने लाँग टर्म व्हिसासाठी अर्ज केला. राज आता आपली पत्नी आणि मुलासह जेनेव्हा येथे राहतात. तो रेस्टाॅरन्टमध्ये काम करतो आणि लवकरच स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करण्याची त्याची इच्छा आहे.

थोडक्यात बातम्या-

“गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का?”

‘शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर…’; आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकाला संभाजीराजेंचं उत्तर

‘तिचे माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध होते’; राज कुंद्राचा खळबळजनक खुलासा

“आम्ही कोरोनाने मेलो तरी हरकत नाही, मुलांना लस मिळायला हवी होती”

भाजपला मोठा धक्का!; एकाचवेळी 15 नेत्यांचा पक्षाला रामराम

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More