“एवढं काम करतोय की काम करून करून…”; अजित पवारांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DY CM Ajit Pawar) यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच पोलीस दलाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
पोलिसांना तिथं आंदोलन होणार आहे हे आधिच का नाही कळालं, मीडिया पोलिसांच्या आगोदर घटनास्थळी होता. तसंही जे घडतंय ते दाखवणं मीडियाचं कामच आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार वारजे माळवाडी येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
ओबीसी आरक्षण, नगरपरिषद निवडणूक, महापालिका निवडणूक अशा मुद्दांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. एवढं काम करतोय की काम करून करून आता डोक्याला केस राहिली नाहीत, असं अजित पवार म्हणाले आहेत. परिणामी अजित पवारांच्या वक्तव्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
“पवार कुटुंबानं महाराष्ट्राला विकत घेतलं आहे का?”; निलेश राणेंचा खोचक सवाल
“…तर धोनीच्या संघाचं काही खरं नाही”; दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत गृहमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत ते तपासावं लागेल”
गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने शरद पवारांवर केलेल्या आरोपाने खळबळ
Comments are closed.