बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार?”

अलिगढ | आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं असताना एमआयएम (MIM) नेत्याने अजब विधान केलं आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) उत्तर प्रदेशात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या एका जिल्हाध्यक्षाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ओवेसींना पंतप्रधान करायचं असेल तर मुस्लिमांनी काय करावं या संदर्भातील अजब विधान एमआयएम जिल्हाध्यक्षांनी केलं आहे.

‘मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार? असदुद्दीन ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार? शौकत अली साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कसे होणार?’, असं म्हणत अलिगढचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी मुस्लिम जनतेला अधिक मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, या व्हिडीओनंतर नूर यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. बलिदानात आमचं योगदान असलं तरी आमची लोकसंख्या कमी आहे. ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होतील यावर आमची चर्चा सुरू होती आणि त्यात काहीच गैर नाही, असं स्पष्टीकरण नूर यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकारच्या टाळाटाळीमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले”

क्वारंटाईनचे नियम तोडून आलिया भट्ट पोहोचली दिल्लीला; आता मुंबईत परतताच…

टीम इंडियात नक्की चाललंय का?, सौरव गांगुलीचा दावा कोहलीने फेटाळला

हरभजन सिंग काॅंग्रेसमध्ये जाणार का?; सिद्धूंच्या ट्विटची एकच चर्चा

Omicron नाही तर ‘या’ व्हेरियंटचा अधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More