बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजब लग्नाची गजब गोष्ट; अन् चक्क वयाच्या 60 व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर

अहमदनगर | आतापर्यंत आपण अनेक विवाह सोहळे पाहिले असतील. पण अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात पार पडलेल्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील 60 वर्षीय आजोबा दुसऱ्यांदा लग्न बेडीत अडकल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, शिंदोडी येथील विदुर आजोबा तबा चिमाजी कुदनर यांनी आपल्या वयाच्या 60व्या वर्षी 40 वर्षीय महिलेशी लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे सध्या आजूबाजूच्या परिसरात 60 वर्षीय आजोबांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कुदनर या 60 वर्षीय आजोबांच्या पत्नीचं गेल्या वर्षी निधन झालं होतं. दरम्यान, कुदनर यांचा सांभाळ करण्यासाठी घरात कोणीही नसल्याने व मुलीचा विवाह झाल्याने ते घरात एकटेच पडले होते. त्यामुळे उतारवयात सांभाळ करण्यासाठी कोणीतरी व्यक्ती असावी यासाठी कुदनर आजोबा यांनी 40 वर्षीय महिलेशी विवाह केला आहे.

संबंधित लग्न हे एकटेपणामुळे करत असल्याचं कुदनर यांनी बोलून दाखवलं आहे. तसेच नात्यातीलच सुमन नावाच्या 40 वर्षीय महिलेशी कुदनर आजोबा मित्र व मुलीच्या आग्रहास्तव विवाहबद्ध झाल्याने या अजब विवाह सोहळ्याची सध्या सोशल मीडियासह परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

थोडक्यात बातम्या

बलात्कारानंतर आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव अन्..; चक्रावुन टाकणारा प्रकार

मुंबईकरांनी करून दाखवलं; मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत विक्रमी घट

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा; पाहा आजचे सकारात्मक आकडे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मोदी सरकारकडुन प्रत्येकी 2 हजार रूपये

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More