बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजब प्रकार! कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या वस्तू अन्…..

नाशिक | देशात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. लस घेतल्यानंतर अनेक वेगवेगळे किस्से ऐकायला मिळत आहे. अशातच कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू तसंच नाणी चिकटत असल्याची अजब घटना समोर आली आहे.

नाशिकच्या सिडको भागातला हा प्रकार आहे. अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. अरविंद सोनार यांनी 9 मार्चला कोरोनाची लस घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नी सोबत होत्या. यानंतर 2 जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांच्या मुलानं टीव्हीवर एका व्यक्तीनं लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी साहित्य चिकटत असल्याचं पाहिलं होतं. म्हणून त्यानं घरी आई-वडिलांवर प्रयोग करुन पाहिला असता वडिलांच्या शरिराला लोखंड, स्टील आणि नाणी चिकटत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबानं तात्काळ खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिकटत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे, असं अरविंद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंही हा चमत्कार नसून घाबरुन जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. हा विज्ञानाचा एक भाग असून वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल असं त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

ऑनड्यूटी रोमँटिक व्हिडीओ बनवणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

देशात एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद; नव्या बाधितांची संख्या 1 लाखांच्या आत

चेहरा झाकलेल्या ‘या’ महिलेने तरुणासोबत केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनमुळे ‘हा’ अभिनेता झाला बेरोजगार; पैशांसाठी विकावी लागली आवडती बाईक

हे सरकार नुसतं टिकणारच नाही तर पाच वर्षे टिकेल- शरद पवार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More