मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने दोन ते चार दिवसांपासून अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. याच वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून कंगणावर निशाणा साधला होता. या टीकेवर भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायलाच हवा, असं राऊतांनी अग्रलेखात म्हटलं होतं, याचाच धागा पकडत नितेश राणेंनी राऊतांवर टीका केली आहे.
कंगणासारखे उपरे आणि दिनो, गोमेझ, जॅकलिन फर्नांडीस आणि दिशा पटानी अस्सल मराठी, हो ना?, असा सवाल राणेंनी केला आहे. त्यासोबतच टेंडर देताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे होती?, असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, कंगणाला आज केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. कंगणा 9 तारखेला विमानतळावर आल्यावर शिवसेना काय पाऊल उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कंगणाने मुंबईत पाऊल ठेवल्यावर तिला बेड्या ठोका, अशी तक्रार एका संतप्त मुंबईकराने पोलिसात दाखल केली आहे.
Kangana सारखे “उपरे”
आणि
Dino,Gomez,jacqueline,patani “अस्सल मराठी” !!
हो ना ??
टेंडर देताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे होती ???— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2020
महत्वाच्या बातम्या-
मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगणाला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक- अनिल देशमुख
“धमकीचे फोन खरे की कुणी जाणीवपूर्वक करतंय, याची चौकशी झाली पाहिजे”
कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, पण…- देवेंद्र फडणवीस
गर्भवती बायकोच्या परीक्षेसाठी तब्बल १,२०० किलोमीटरचं अंतर स्कुटरवरून केलं पार!
हिमाचल प्रदेशातील एका विद्यार्थ्याच्या एनडीए परीक्षेसाठी टॉय ट्रेन धावली!
Comments are closed.