मुंबई | भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला आग लागली. या दुर्घटनेत 10 बालकांचा मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलंय.
“या संबंधित दुर्घटेनेमध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचं तातडीने ऑडीट करण्याचं निर्देश देण्यात आले असल्याचं,” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय.
अजित पवार पुढे म्हणाले, “आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी मी चर्चा केली आहे. रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसंच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आलेत.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या घटनेची तात्काळ दखल घेतलीये. उद्धव ठाकरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.
थोडक्यात बातम्या-
डीआरएसच्या निर्णयावरून चिडलेल्या टीम पेनने अंपायरना वापरले अपशब्द
रोहित शर्मावर शंका घेणं महागात; ‘त्या’ काकांना काढावी लागली अर्धी मिशी!
‘लस घेतलेल्या लाभार्थ्यांची अशी पटणार ओळख’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल
औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….