पुणे | पुणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत सरकराने कडक पाऊल उचललं आहे. यावर जिल्ह्यातील उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नका. त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या सूचना अजित पवार यांनी पोलीस खात्याला दिल्या आहे.
पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरसुद्धा उपस्थित होते.
दरम्यान, पुणे परिसरात असणाऱ्या उद्योग वसाहतीमध्ये परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या उद्योजकांना त्रास देणाऱ्या टोळ्या वाढल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या विरोधात मोक्क्यासारखीची कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेे आहेत.
#पुणे – उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा. कामगारमंत्री @Dwalsepatil , विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आदी उपस्थित. उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना #मोक्का लावण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश pic.twitter.com/3ZDCoouLMk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 8, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ- प्रवीण दरेकर
…म्हणून मनसेच्या मोर्चाला माझ्या गाड्या- महेश लांडगे
महत्वाच्या बातम्या-
“काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सत्ता चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”
गोडसेला श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची गरज नाही- संजय राऊत
मी नाराज नाही, पूर्णपणे पक्षासोबत आहे- तानाजी सावंत
Comments are closed.