बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

बीड | मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनातर्फे 10 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी हा आदेश काढला आहे. 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत बीड जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू केले जात आहेत. यापूर्वी नांदेड जिल्ह्यात पालक मंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशानंतर 24 तारखेपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता बीड जिल्ह्यातही 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्याच्या या लॉकडाऊन अंतर्गत सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दुकानदारांना दुकान उघडण्याची परवानगी देण्यात आली असून सामाजिक अंतर ठेवणं आणि मास्क सर्वांनी वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच जिल्ह्यात दूध विक्री करण्यासाठी सकाळी 10 वाजेपर्यंतच परवानगी असणार आहे. सकाळी 10 नंतर फळभाज्या, दूध विक्री व इतर आस्थापना या संपूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मिशन बिगीन अगेननंतर बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमधुन अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती व वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आस्थापना यांना सुट देण्यात आली आहे. व इतर आस्थापना या सकाळी 9 नंतर संपूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

थोडक्यात बातम्या  –

बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे फक्त 3 दिवस; ‘या’ कारणाने पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद

इंग्रजी शिकताना झाली गंमत, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

“लवंगी फटाका की, बाॅम्ब लवकरच स्पष्ट होईल”; देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला; संजय राऊतांची खोचक टीका

खोकला झाला म्हणून डाॅक्टरांकडे गेल्यावर छातीत जे आढळलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More