बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्युट! बोट तुटलं तरीही ‘तो’ सामना खेळायला मैदानात उतरला

नवी दिल्ली | भारत आणि न्युझीलंडमधील अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटचा पहिल्या विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने भारताला 8 गड्यांनी पराभूत केलं आहे. कर्णधार केन विल्यमन्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने सामना जिंकला असला तरी न्यूझीलंडच्याच एका खेळाडूने सर्वांची मनं जिंकली आहेत.

न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज बीजे वॅटलिंग आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मॅच खेळला. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना त्याच्या कारकीर्दीतला शेवटचा सामना होता. याच सामन्यादरम्यान एक थ्रो झेलताना करंगळीजवळच्या त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळं त्याचं बोट फ्रॅक्चर झालं. पण बोट फ्रॅक्चर होऊनदेखील त्याने आपली विकेट किपिंग सुरुच ठेवली. ब्रेकनंतर देखील दुखापत झाली असतानाही त्याने विकेट किपिंग सुरुच ठेवली. त्यावेळी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्याचं टाळ्या वाजवून कौतूक केलं. सामना जिंकल्यानंतर त्याच्यावर उपचार केले गेले.

कारकिर्दीतील शेवटची मॅच खेळताना दाखवलेल्या खेळाडूवृत्तीचं क्रिकेट विश्वात जोरदार कौतुक होत आहे. त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने तीन कॅच पकडले. त्यातले दोन कॅच त्याने त्यावेळी पकडले ज्यावेळी त्याचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी त्यानं आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. भारताचा मुख्य गोलंदाज जस्प्रित बुमराह खास कामगिरी करू शकला नाही. तर भारतीय फलंदाज पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. तर विराट कोहलीच्या संघ निवडीवर आणि कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

थोडक्यात बातम्या-

जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

मी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, असे धंदे मी करत नाही- जितेंद्र आव्हाड

मंत्री बच्चू कडूंनी वेशांतर करुन टाकलेल्या धाडीमुळे धक्कादायक माहिती समोर!

भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकावर न्युझीलंडने कोरलं नाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More