बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्यूट! डाॅक्टर आणि नर्सवर हात उचलण्याआधी हा व्हिडीओ एकदा नक्की पहा

मुंबई | कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. यात डाॅक्टर, पोलीस, पत्रकार यांचाही समावेश आहे. मात्र डाॅक्टर, पोलीस, पत्रकार असे अनेक लोक आपल्या कामाला प्रथम स्थान देत आहेत. अशातच एका नर्सचा व्हिडीओ देशभर व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडीओ हा मध्य प्रदेशच्या राज्य माहिती आयुक्तांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे. सध्या कोरोना महामारीमुळे लोक आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवत आहेत. त्यानंतर डाॅक्टर आणि नर्सने आपलं काम व्यवस्थित न केल्यामुळे पेशंटचा मृत्यू झाला, असा आरोप अनेक नातेवाईक करतात. मात्र व्हायरल झालेला हा व्हिडीओ सर्वांना त्यांच्यावर बोट उचण्याआधी विचार करण्यास भाग पाडेल.

या व्हिडीओमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. महिलेची प्रकृती खराब असल्यामुळे तिला ऑक्सिजन मास्क लावण्यात आलं आहे. अशातच कर्तव्यावर असलेल्या संबंधित नर्स त्यांना जेवण भरवत आहे. यादरम्यान एक घास चारल्यानंतर नर्स लगेच महिलेला मास्क लावत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कमेंट्स करुन लवकरच देश या संकटातून बाहेर पडेल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित व्हिडीओ हा गुजरातच्या कैंसर रुग्णालयातील आहे. जागा बदलेल मात्र काम असंच आहे, असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबो! ‘या’ अभिनेत्रीला कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचा झालाय एवढा आनंद, म्हणते…

#विधानसभा_निवडणुक2021 तामिळनाडूत सत्तांतराची शक्यता; द्रमुक तब्बल एवढ्या जागांवर आघाडीवर

“देशात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करा”

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर पण ममता बॅनर्जींचा पराभव?

“अंगावरचे सगळे कपडे काढ” दिग्दर्शकाने केलेल्या विचित्र मागणीचा ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More