बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्यूट! पतीच्या ‘त्या’ स्वप्नपूर्तीसाठी पत्नीने केलेल्या त्यागाचं तुम्हालाही वाटेल कौतुक

नवी दिल्ली | स्वतःचं आणि कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यभर झटत असतो. त्याच्यासाठी आपण जीवाची पराकष्टा करत असतो. अशातच अशीच काहीशी एक प्रेरणादायी बातमी समोर येत आहे. आपल्या पतीचं स्वप्न सत्त्यात उतरवण्यासाठी एका महिलेनं तब्बल 13 वर्षे अन्नग्रहण केलं नसल्याचं समोर आलय.

पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल 13 वर्षे अन्नत्याग केला असलेल्या महिलेचं नाव उषा छापेला असं आहे. या कालाधीत त्यांनी फक्त फलाहार ग्रहन केलं आहे. मारवाडच्या मदर तेरेसा म्हणून उषा यांची ओळख आहे. त्यांनी पतीचं वृध्दाश्रमाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल 13 वर्षे अन्नग्रहण केलं नाही.

उषा या पालीमधील मारवाड जंक्शन इथं राहत असून नरसिंहपुरा या ठिकाणी सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. 13 जून 2003 रोजी त्यांचे पती राधेशाम छापेला यांचं एका मोटार अपघातामध्ये निधन झालं. पतीचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पतीच्या निधनानंतर मिळालेल्या विमा रकमेतून वृध्दाश्रमासाठी जमीन विकत घेतली आणि वृध्दाश्रम उभं केलं. उभारणी पूर्ण झाल्यावर 13 जून 2015 रोजी पतीच्या स्मृतीदिनानिमित्त वृध्दाश्रमाचं उदघाटनही केलं. त्या वृद्धाश्रमाला ज्ञानुषा हे नाव दिलं.

दरम्यान, या वृध्दाश्रमात 10 वृध्द राहत असून त्यांच्या देखभालीची सर्व सोय करण्यात आली आहे. स्वतंत्र कपाट, झोपण्यासाठी पलंग, फिरण्यासाठी बाग, महिला-पुरूषांसाठी वेगळी स्वच्छतागृहे बनवली आहेत. टीव्ही व साऊंड सीस्टीम सारखी करमणुकीची साधनेदेखील तिथे उपलब्ध करुन दिले आहे. वृध्दांच्या आरोग्यतपासणीसाठी वेळोवेळी डॉक्टर येतात. ज्या वृध्दांना मुलं आहेत त्यांना बोलवून समजावून वृध्दांना घरी पाठवलं जातं. पतीच्या पेन्शनमधून व व्यापाऱ्यांनी दिलेल्या देणगीमधून हे वृध्दाश्रम चालवत असल्याचं उषा यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

खड्ड्यांवरुन ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; अमित ठाकरेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस पक्ष हेडलेस असल्यानं भाजप नेते त्याचा फायदा घेत आहेत – संजय राऊत

कंगना रणौत योगींच्या भेटीला, ‘या’ मोहिमेची बनली ब्रँड अॅम्बेसिडर

….अन् या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More