बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीओपी गणेश मुर्तींवर कडक बंदी, चुक कराल तर भराल 10 हजारांचा दंड

चंद्रपूर | गणेशोत्सव हा आपला महाराष्ट्रातील एक मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो. याचं महत्व हे खूप मोठं आहे. गाव, वस्ती, तांडा, शहर या सर्व भागात अगदी जोमाने गणेशोत्सव साजरा केला जातो. जसजशी वेळ पुढे गेली तसतसा हा उत्सव साजरा करण्याच्या पध्दती बदलत असल्याचं आपण पाहत आहोत. चिखलाच्या गणेश मुर्तींची जागा आता पीओपी गणेश मुर्तींनी घेतली आहे.

आपल्या आरोग्याला, नैसर्गिक संपत्तीला, प्राण्यांना या पीओपीपासून बनत असलेल्या गणेश मुर्तींचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. या कृत्रिम बनावटीचा धोका थेट आपल्या जैवविविधतेला निर्माण झाला आहे. परिणामी जीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. या सर्व विपरित परिणामांचा विचार करुन केंद्र शासनाच्या धोरणानुसार महानगरपालिकेने मुर्तींवर बंदी घातली आहे.

चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मुर्ती बनवणे, दुकानात ठेवणे, आयात करणे, निर्यात करणे, विक्री करणे या सर्व गोष्टींवर स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे. पीओपी मुर्तींची साठेबाजीसुध्दा आता धोक्याची असणार आहे. चंद्रपूर शहरातील सर्व गणेश मुर्ती व्यापाऱ्यांची व मुर्तीकारांची महानगरपालिकेच्या नविन प्रशासकीय इमारतीत बैठक घेण्यात आली.

गणेशमुर्ती विक्री दुकानात या पुढे कोणत्याही प्रकारची पीओपी मुर्ती आढळली तर त्या दुकानदाराला दंड आकारण्यात येईल. तर त्याचं डिपाॅझीट सुद्धा जप्त करण्यात येईल, दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश मनपाचे आयुक्त राजेश मोहीते यांनी दिले आहेत. मनपा क्षेत्रात पीओपी मुर्तींना पुर्णत: बंदी असेल.

थोडक्यात बातम्या

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?, पुण्यातील ‘इतक्या’ गावांना संभाव्य धोक्याचा इशारा

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

पाकिस्तानच्या अर्शदला पदक मिळालं असतं तर मलाही आनंद झाला असता- नीरज चोप्रा

‘पंतप्रधान मोदींनी माझ्या लोकप्रियतेमुळेच टिकटाॅकवर बंदी आणली’

“मराठीपेेक्षा हिंदी चित्रपटांना झुकतं माप देता, कुठं आहेत शाखरूख, सलमान?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More