बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोपांची मालिका सुरु झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळत चालल्याचं दिसत आहे.

आज सकाळी 7 वाजता मलिक यांना त्यांच्या घरातून ईडी अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले. आज सकाळी 8 वाजल्यापासून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवरुन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. ईडी  कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहून ईडी कार्यालयासमोर पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, कुठलीही नोटीस न बजावता मलिकांना ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला’, भाजपचा हल्लाबोल

“भाजपने स्वतःचा ईडी चालवायला माणूस ठेवला असेल”

“प्रत्येकाला देशासाठी कुर्बान व्हावं लागेल, आता हौतात्म्य आलं तरी चालेल”

नवाब मलिकांवरील कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दूध ना साखर, ब्लॅक कॉफीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More