बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन

पुणे | महाराष्ट्रात ठराविक वेळेपूर्वीच मान्सूनचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. समाधानकारक पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

अलिबागमार्गे नुकतच पुण्यात मान्सूनचं आगमन झालं असून सोलापूर मार्गे मान्सून तेलंगणा, आंध्र प्रदेशकडे आगेकूच करत आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद आणि रायगड या नऊ जिल्ह्यांमध्ये मान्सूनने आगमन केलं आहे.

मान्सूनच्या आगमनामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांनीही पावसाळी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार लवकरच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल होईल.

दरम्यान, दरवर्षीपेक्षा चार दिवस लवकर यंदा पुण्यात मान्सून दाखल झाला आहे. तसेच रत्नागिरीच्या बंदरावरून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. त्याबरोबरच येणाऱ्या 24 तासात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

आनंदाची बातमी! पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

खुशखबर! अनलिमिटेड इंटरनेट पॅकसाठी ‘ही’ महापालिका चक्क विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार 1 हजार रुपये

मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संशयी प्रवृत्ती बळावल्या 5 महिन्यात तब्बल एवढ्या तक्रारी

नागपूरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज फक्त 196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More