बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत कालची मॅच हरल्यानंतर पंजाबमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

नवी दिल्ली | काल दुबईत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर 10 विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानं भारतीय चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यातच काल झालेल्या या सामन्यानंतर पंजाबमधील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कालच्या सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवल्यानंतर पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील भाई गुरूदास इन्स्टिट्युट आणि खरारमधील रयत बहराट विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, हरियाणा या भागातील विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे.

भारत पाकिस्तानविरोधात सामना हरल्यानंतर काही विदयार्थी वसतिगृहातील काश्मिरी विद्यार्थ्यांच्या खोल्यामध्ये घुसले आणि तेथील विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून मारहाण करू लागले. खोल्यांची तोडफोड केली. काही वेळाने स्थानिकांनी आणि वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांनी येऊन काश्मिरी विद्यार्थ्यांना या हाणामारीतून वाचवले.

मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. जम्मू आणि काश्मिर विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते नसीर खुहेमी यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. याशिवाय एका विद्यार्थ्यांने सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडून विद्यार्थ्यांना आत येऊ दिलं आणि काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करून दिल्याचा आरोप केलाय.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राची धाकधूक वाढली, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव

थलायवा रजनीकांत यांनी सोशल मीडियाद्वारे केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री है”

T-20 World Cup: भारताच्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पाहा गेल्या 24 तासातील दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More