मोठी बातमी! रशियाने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धानं संपूर्ण जगावर गंभीर परिणाम केला आहे. या युद्धामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशातच भारतीयांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे.
रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. रशियाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव नवीन शेखराप्पा असं आहे. रशियाकडून झालेल्या या गोळीबारात आणखी 11 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील विद्यार्थी आणि नागरिक भयभीत झाले आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांचे पालकही खूप चिंतेत आहेत. युद्धाच्या सहाव्या दिवशीही युद्धाचं वारं गडद असल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 16 मुलांसह 352 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. या युद्धात रशियन सैनिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
थोडक्यात बातम्या –
निलेश राणेंच्या नव्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले…
“लवासाप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही”
“सरकार त्यांचं मुख्यमंत्री त्यांचे मग राऊतांना पंतप्रधान कार्यालय कशाला हवं?”
“उद्धव ठाकरे तात्काळ नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”
…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; युक्रेनमधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर
Comments are closed.