एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या, एकाला अटक

एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या, एकाला अटक

पिंपरीचिंचवड | एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आलीय. निगडीतील पूर्णानगर भागात ही घटना घडली. हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

दहावीत शिकणारा वेदांत भोसले मैत्रीणीसोबत अभ्यास करून रात्री तिला सोडण्यासाठी गेला होता. तिला सोडून घरी येत असताना त्याच्यावर हा हल्ला झाला. काही नागरिकांनी वेदांतला दवाखान्यात दाखल केलं, मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

वेदांत ज्या मुलीबरोबर अभ्यास करायचा त्या मुलीवर आरोपी प्रेम करायचा. अभ्यासाच्या माध्यमातून वेदांत मुलीच्याजवळ जात असल्याचा आरोपीचा समज झाला. यामुळे वेदांतचा हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

Google+ Linkedin