बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Student Protest: ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक, विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप

मुंबई | राज्यातील महाविद्यांलयांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता. मात्र या निर्णयाच्या विरोधात नागपूर, मुंबई, बीड आणि पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. हळूहळू संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरत असलेले पहायला मिळत आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्या या मागणीसाठी विद्यार्थी रस्तावर उतरले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याचं पहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे एकच खळबळ उडली की विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे कोणाचा हात आहे.

धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक याला अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याच्यावर करण्यात आला आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संशय व्यक्त केला असून चौकशीचे संकेत दिले.

थोडक्यात बातम्या – 

Budget 2022: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ‘ही’ मोठी घोषणा

Budget 2022: ‘इतक्या’ लाख नव्या नोकऱ्या देणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2022: 1 फेब्रुवारीपासून तुमच्या खिशावर होणार परिणाम, बदलणार ‘या’ गोष्टी

‘पुष्पा असो किंवा फुसका लेकिन झुकेगा नही साला’; भाऊ कदमचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ

“तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपला संपवून टाका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More