Student Protest: ऐकलं नाही तर पुन्हा ताकद दाखवू, हिंदुस्थानी भाऊचा ठाकरे सरकारला इशारा
मुंबई | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन आणि वेळाप्रत्रकानुसार होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नसल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे राज्यभर सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पहायला मिळत आहे.
सोशल मीडिया स्टार ‘हिंदुस्थानी भाऊ ‘ म्हणजेच विकास पाठक यानं आपण रस्त्यावर उतरलो असल्याचं धारावीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलं. अशातच हिंदुस्थानी भाऊचाही सरकारला पुन्हा आंदोलन करु, असा इशारा देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
धारावीसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून काही ठिकाणी तोडफोडदेखील करण्यात आली. यावेळी धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली आणि वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन केलं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षा घेण्याचा मागणीला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली होती. तसंच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भेटीसाठी पोहोचला होता.
पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
विद्यार्थ्यांच्या आंदोनलनानंतर वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
“मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू अन् काय देव पावलाय गं”; भाजप प्रवक्त्याचं सरकारवर टीकास्त्र
‘मी बाजीराव आहे, तर माझी मस्तानी कुठंय’; गिरीश बापटांच्या वक्तव्याची एकच चर्चा
ऑफलाईन परीक्षेवरून वाद पेटला, वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; किरीट सोमय्यांचा खोचक सवाल
Comments are closed.