बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही”

मुंबई | राज्यात कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाचं पुर्ण शुल्क भरू शकले नाहीत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नका, त्यांनी परीक्षा फॉर्म भरू द्या, अशी मागणी केली होती. गव्हाणे यांच्या या मागणीला यश आलं आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. सध्या महाराष्ट्रात कोविड आजाराने थैमान घातलं आहे. अनेक विद्यार्थ्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत, काहींच्या पालकांचे रोजगार बुडाले आहेत. तर काहींचे पालक दगावले आहेत अशा गंभीर परिस्थितीत राज्यातील काही महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या मागे शुल्कासाठी तगादा लावत आहेत.

कोणताच विद्यार्थी महाविद्यालयाची बुडवून जाणार नाही. आज ना उद्या विद्यार्थी शुल्क भरतीलच त्यांना थोडी मुभा मिळावी, असं सुनिल गव्हाणे यांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पत्र लिहिलं होतं.

सर्व पात्र विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षा 2021 चे परीक्षा अर्ज विहित कालावधीत भरुन घेतले जातील याची खबरदारी संस्था प्रमुखांनी घ्यावी. तसेच आपल्या संस्थेतील एकही पात्र विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास, विद्यार्थ्यांच्या होणा-या शैक्षणिक नुकसानास संस्था प्रमुख म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार रहाल याची नोंद घेण्यात यावी, असं महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

#कोराना! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन

कोरोनाबाधित चुलत भावाच्या अंगावर थुंकल्याचा आरोप, बीडमधील घटनेनं खळबळ

कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा भोवला- रघुराम राजन

मोदींचे अनुमोदक छन्नूलाल मिश्रांचा भाजपला विसर, घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

पंढरपूरची निवडणूक पुन्हा घेण्याच्या मागणीवर मोठा खुलासा, राष्ट्रवादी म्हणते ते पत्र खोटं!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More