बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लवकर वसतिगृहे चालू करा! स्टुडंट हेलपिंग हँड व छात्रभारतीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पुणे | कोरोना (Corona) महामारीच्या प्रादुर्भावामुळं गत दीड वर्षापासून बंद असणारी महाविद्यालयं (Colleges) आता सुरू करण्यात आली आहेत. पण ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर वसतिगृहे (Hostels) चालू करण्यात यावी यासाठी सर्वत्र सध्या आंदोलन करण्यात येत आहेत. अशातच स्टुडंट हेलपिंग हँड व छात्रभारतीकडून (Student Helping Hand and Chhatrabharati) पुणे जिल्हाधिकारी (District Collector) कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं.

स्टुडंट हेलपिंग हँड आणि छात्रभारतीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी प्रमुख तीन मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती त्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांंच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाविद्यालये सुरू झालेली असली तरी अद्याप वसतिगृहे सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची गैरसोय होत आहे. स्वाधार योजनेचाही विद्यार्थ्यांना मिळावा इतका फायदा अजून मिळालेला नाही. आज विद्यार्थ्यांनी यासंदर्भात तीव्र आंदोलन केलं आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आयुक्त प्रशांत नारनावरे यांची भेट घेतली आणि एक तास चर्चा झाली. स्वत: आज ते विश्रांतवाडी येथील वसतिगृहाची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, आयुक्तांनी सोमवारपर्यंत वसतिगृहाबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. जर सोमवारी सुरु नाही झाली तर परत शिष्टमंडळास चर्चेस बोलवले जाणार आहे. जे खराब वसतिगृह झालेत त्या खोल्या सोडून इतरत्र राहण्यास परवानगी देणार असे आयुक्त म्हणाले आहेत, अशी माहिती स्टुंडट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर (Kuldeep Ambekar) यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या 

देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती, स्वत:च केला खुलासा

विराट कोहली Out की Not Out?, अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; पाहा व्हिडीओ

बिबट्या थेट वर्गात शिरला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

अबब… लाखाचे केले 72 लाख!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

परमबीर सिंहांनी पुन्हा ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले, हे मोठं पाऊल उचलणार!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More