बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विद्यार्थ्यांना भरलेल्या फीचे पैसे मिळणार परत; आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

हैदराबाद | कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकाडाऊनमुळे सर्व व्यापार, उद्योगधंदे, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे आपल्या देशाला खूप मोठ आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महाविद्यालयेही बंद असल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशातच आंध्र प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांना भरलेली फी आता 100 टक्के परत करण्याचा निर्णय आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी सरकारने घेतला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना 4 टप्प्यात हे फीचे पैसे मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यासाठी सरकारने विद्या दिवेता योजना तयार केली आहे.

विद्यार्थ्यांना विद्या दिवेता योजनेतून चार टप्प्यात फीचे पैसे परत मिळणार आहेत. हे पैसे विद्यार्थ्यांच्या आईच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सध्या देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांचाच रोजगार बुडत आहे. त्यामुळे लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने विद्यार्थ्यांनी भरलेली फी त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अभिनेता इरफान खानचं निधन; ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आयटी कंपन्यांना तब्बल इतक्या दिवसांपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’; केंद्र सरकारची मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”

धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More