‘विद्यार्थ्यांनो तुमचं हे बागडण्याचं, खेळण्याचं वय आहे, पण…’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची विद्यार्थ्यांना भावनिक साद
मुंबई | राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सर्वसामान्यांसह नेत्यानांही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. यात आता अजून एका बड्या नेत्याची भर झाली आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रुग्णालयात उपचार घेत असून तेथूनच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक भावनिक पत्र लिहलंय.
राजेश टोपे यांनी एक दिवसापूर्वीच हॉस्पिटलमधून विद्यार्थ्यांना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी असं लिहलंय, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरोधात लढाई लढत आहोत. शासनाने याबाबत खंबीर भूमिका आणि ठोस उपाययोजना केल्या आहेत. तसंच अनेक कोरोना योद्धे, विशेषत: डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार जीवाची पर्वा न करता लढत आहे. यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो, मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही, तो पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार आहे, असा संदेश आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना पत्राद्वारे दिला आहे.
शाळा अन् महाविद्यालये नुकतेच सुरु झाले आहेत. मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. विद्यार्थ्यांनो तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय आहे. पण गेल्या वर्षभरापासून आपण घरीच बसून आहात. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, सर्वप्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आई-वडिल, भाऊ-बहिणी आणि कुटुंबातील लोकांची काळजी घ्या. बाहेरुन आल्यानंतर हात पाय तोंड धुतले जातात का, मास्क वापरला जातो का, कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले जाते का, हे तुम्ही काळजीपूर्वक पाहा.
कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास संबंधित सदस्याला लगेचंच सरकारी रुग्णालयात घेऊन जा. मित्रांनो,आजचा विद्यार्थी उद्या देशाचा आधारस्तंभ आहे. तरुणांचं मन सकारात्मक, बुद्धी सतेच आणि शरीर सदृढ पाहिजे, तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तर, मग चला मला मदत करणार ना? मला तुमची खात्री आहे. आपण, ही लढाई नक्की जिंकू…. असं भावनिक आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र शेअर केलं आहे. तसेच, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी राज्यातील जनतेला कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 24, 2021
थोडक्यात बातम्या –
‘…पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरुवर कारवाई का नाही?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
कुत्रा चावल्याच्या रागातून तरूणाने कुत्र्याचाच घेतला जीव!
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
एकनाथ खडसेंना भोसरी जमिन प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा!
सुप्रसिद्ध PK सिनेमाचा सिक्वेल येणार; आमीरच्या जागी ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत!
Comments are closed.