Top News देश

लेडी सब इन्स्पेक्टरकडून मानवतेचं दर्शन; एकत्र मृतदेह खांद्यावर घेऊन दोन किलोमीटर प्रवास केला; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशमधील एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने माणुसकीचं दर्शन घडवून दिलं आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा कासीबुग्गा नगरपालिकेच्या आदिविकोट्टुरू गावात एका मृतदेहावर कोणीही हक्का सांगितला नाही. कोरोनाच्या भातीने गावातील एकानेही मृतदेहाला स्पर्श केला नाही.

उपनिरीक्षक के. श्रीशान या तेथे तैनात होत्या. त्यांनी हे सर्व चित्र पाहिलं त्यानंतर श्रीशान यांनी पुढाकार घेतला आणि ललिता चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने एकत्र येत मृतदेह खांद्यावर घेत दोन किलोमीटरपर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी मृतदेहावर स्वत: अंत्यसंस्कार केले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. कृष्णा रेड्डी यांनीही तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या या कामाचं कौतुक केलं आहे. आपल्या कर्तव्याची जाण ठेवत अज्ञात मृतदेहावर अंत्यसंस्कार करून आपल्या देशातील पोलिसांची मानवी मुल्य जागवली आहेत.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून के. श्रीशान यांचं कौतुक केलं जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मनसेला धक्का! मनसेच्या या बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा….- गोपीचंद पडळकर

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा राज्यसभेतही बोलबाला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या