Subhaan Mansuri | इंस्टाग्रामवरील अल्पवयीन इन्फ्लुएंसर्स सुब्हान मंसुरी (Subhaan Mansuri) आणि सैफीना (Saifeena) यांनी आपल्या कंटेंटमुळे पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. त्यांच्या नवीन रीलने मात्र सगळ्याच मर्यादा ओलांडल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी किती दूर जावे, याचीही चर्चा या व्हिडिओमुळे सुरू झाली आहे.
विवादित व्हिडिओ-
सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सुब्हान आणि सैफीना एका रेस्टॉरंटमध्ये बसून एकमेकांना भुरळ घालताना दिसत आहेत. अन्न खात असताना ते एकमेकांशी अशा पद्धतीने वागत आहेत की ते पाहून अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक इंटरनेट युजर्सनी हा व्हिडिओ अत्यंत ‘क्रिंज’ असल्याचे म्हटले असून, अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर प्रवेश द्यावा की नाही, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Hello people in power, 14 years old “kids” influencing other kids of their age, informative enough? No? Any action on them or at least their parents? pic.twitter.com/wNwa1t0pqa
— Madhur (@ThePlacardGuy) February 22, 2025
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अल्पवयीन मुलांसाठी कठोर नियम करण्याची मागणी केली (Subhaan Mansuri) आहे. काही युजर्सनी सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
कोण जबाबदार? पालक, समाज की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स?
अनेकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे की अशा प्रकारच्या कंटेंटसाठी जबाबदार कोण? पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी कठोर धोरणे आखायला हवीत?
सोशल मीडिया नियमन आवश्यक?
या प्रकारानंतर सोशल मीडियावर एकूणच नियमन करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अल्पवयीन मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम असणे गरजेचे असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे. अशा कंटेंटमुळे मुलांवर काय परिणाम होईल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.