देश

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला सरकारला घरचा आहेर!

नाशिक | हाॅटेलमध्ये कप बशी धुवावी पण शेती नको, अशी शेतकऱ्यांची मनस्थिती झाली आहे, असं वक्तव्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. नाशिकमधील सभेत हे वक्तव्य करत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

सध्या शेतकऱ्यांची स्थिती भीषण आहे. हाॅटेलमध्ये कप बशी धुवावी पण शेती नको, असं शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना वाटात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

जसं दूधाचं आंदोलन होतं, ऊसाचं आंदोलन होतं, त्याप्रमाणे पोल्ट्रीवाल्यांनी आंदोलन करुन आपल्या मागण्या मान्य करुन घ्यायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुभाष देसाई यांनी पक्षाकडून एकप्रकारे भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांची विधानसभा अध्यक्षांवर टीका करताना जीभ घसरली

रोहित शर्मानं केले 5 विक्रम; विराट आणि धोनीसुद्धा राहिले मागे

काँग्रेसच्या पोस्टरवर राहुल गांधी ‘रामा’च्या तर नरेंद्र मोदी ‘रावणा’च्या अवतारात

‘या’ जागेवर लोकसभा लढण्यासाठी काँग्रेसकडून तब्बल 57 उमेदवार इच्छुक!

भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, व्याजासकट केली परतफेड

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या